नातेपुते येथे डॉ. एम. के. इनामदार यांच्या शुभहस्ते भांड मल्टीस्पेशालिस्ट डेंटल क्लिनिकचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार….

नातेपुते (बारामती झटका)
अकलूजचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम. के. इनामदार यांच्या शुभहस्ते ‘भांड मल्टीस्पेशलिस्ट डेंटल क्लिनिक’ दातांचा दवाखाना पुणे-पंढरपूर रोड, आयडीबीआय बँक शेजारी नातेपुते, ता. माळशिरस, येथे उद्घाटन समारंभ शनिवार दि. 29/06/2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे सौ. इंदुमती व श्री. चंद्रशेखर नागनाथ भांड, डॉ. सौ. क्षितिजा व श्री. अक्षय नितीन भांड यांनी आवाहन केलेले आहे.
तुमच्या दातांचं आरोग्य चांगलं राहावं, तुमच्या चेहऱ्यावर सतत हास्य रहावे, म्हणून होते आहे एक नवीन सुरुवात. दाताचे अत्याधुनिक उपचार आता आपल्या गावात भांड मल्टीस्पेशालिस्ट डेंटल क्लिनिक येथे.



डॉ. सौ. क्षितिजा अक्षय भांड यांच्या दाताच्या दवाखान्यामध्ये वेड्या-वाकड्या दातांवर क्लिपचे उपचार, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, दातांचा कम्प्युटराईज्ड एक्स-रे, अक्कल दाढेवरील शस्त्रक्रिया, दात काढणे, कवळी बसविणे, अल्ट्रासॉनिक मशीनने दात साफ करणे, दातांच्या रंगाचे सिमेंट भरणे, स्क्रूच्या साह्याने दात बसविणे, तोंडाच्या कॅन्सरवरील निदान व उपचार, जबड्याच्या फॅक्चर वरील उपचार, हिरड्यावरील शस्त्रक्रिया, तोंड कमी उघडण्यावरील उपचार, लहान मुलांच्या दातावरील उपचार, सिमेंटने दाताच्या फटी कमी करणे, दंत सौंदर्य यांच्यासह वाकडेतिकडे दात सरळ करण्याचे सर्वात विश्वासार्ह ठिकाण म्हणजेच भांड मल्टी स्पेशालिस्ट डेंटल क्लिनिक.
या दवाखान्याचा शुभारंभ सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी आपण सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये उपस्थित राहावे, अशी भांड परिवार यांच्या वतीने नम्र विनंती आहे.



नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.