विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘ही’ ५ नावं जाहीर
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये पंकजाताई मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, श्री. अमित गोरखे आणि श्री. सदाभाऊ खोत यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक १२ जुलै रोजी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे. विधान परिषदेच्या ११ जागांपैकी भाजपच्या वाट्याला ५ जागा आहेत तर, अजित पवार गटाच्या वाट्याला दोन तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा आहेत. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.