चि. प्रतीक गांधी, नातेपुते आणि चि. सौ. कां. श्रुती दोशी, वडूज यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार.
नातेपुते (बारामती झटका)
स्वर्गीय प्रेमचंद गौतमचंद गांधी यांचे नातू व श्रीमती सीमा व स्वर्गीय वैभव प्रेमचंद गांधी गुरसाळेकर, रा. नातेपुते, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. प्रतीक व स्वर्गीय शांतीलाल मगनलाल दोशी यांची नात व सौ. अंकिता व श्री. अभय शांतीलाल दोशी रा. वडूज, ता. खटाव, यांची सुकन्या चि. सौ. कां. श्रुती दोशी यांचा शाही शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. 26/07/2024 रोजी दुपारी 02 वाजून 37 मिनिटे या शुभमुहूर्तावर राजवैभव सांस्कृतिक भवन नातेपुते, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक श्री. संजय प्रेमचंद गांधी यांनी लग्नकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केलेले आहे.
प्रथम स्मरण अरिहंताचे, सस्नेह निमंत्रण दोन्ही कुलांचे, स्वागत आहे समस्त सह्रदयांचे, आशिष तुमचे अमूल्य प्रेमाचे, मंगल तोरण वाद्याचे, शुभकामना सूर अमृताचे, अतूट बंधन धाग्यांचे, मनोमिलन चि. प्रतीक व चि. सौ. कां. श्रुतीचे, प्रार्थनीय आहे. निमंत्रण आग्रहाचे, राखून ठेवा वेळ, सस्नेह निमंत्रण आगत्याचे, आपले स्नेहांकित सौ. सारिका व श्री. संजय प्रेमचंद गांधी, श्रीमती सीमा वैभव गांधी, सौ. सुवर्णा व श्री. सुरचंद गौतमचंद गांधी, सौ. अलका व श्री. राजकुमार उत्तमचंद गांधी, सौ. प्रगती व श्री. सौरभ संजय गांधी, श्रीमती त्रिशला हरकचंद गांधी, व समस्त गांधी परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे, प्रेषक श्री. संजय प्रेमचंद गांधी आणि समस्त गांधी परिवार, नातेपुते यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.