धोंडेवाडीत कृषिदुतांच्या सहाय्याने आरोग्य शिबिर संपन्न

पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी गावामध्ये दि. २० जुन २०२५ रोजी सकाळी ८ ते १२ या दरम्यान आरोग्य शिबिर पार पडले. यामध्ये गावातील वृद्ध व्यक्तींची शारिरीक तपासणी करण्यात आली व तसेच बदलत्या हवामानामुळे पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रणी बाबतही गोळ्या-औषधे देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. सचिन म्हमाने (B.A.M.S), डॉ. सोमनाथ कसबे [Exhucative managers), अमोल गायकवाड (MCCO), समाधान मस्के, शेखर गायकवाड, सुप्रिया पाटोळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्रा. आर. जी. नलावडे (प्राचार्य रत्नाई कृषि महा, अकलूज), प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.