चि. अक्षय ठवरे पाटील, खुडूस व चि. सौ. कां. अस्मिता कोकरे, पणदरे यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. आनंतराव विठ्ठल ठवरे पाटील, खुडूस व श्री. भानुदास वामनराव कोकरे, पणदरे यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार…
खुडूस (बारामती झटका)
कै. पार्वती व कै. विठ्ठल भाऊ ठवरे पाटील यांचे नातू व सौ. रेश्मा व श्री. आनंतराव विठ्ठल ठवरे पाटील रा. खुडूस, ता. माळशिरस यांचे द्वितीय सुपुत्र चिरंजीव अक्षय (B.Pharmacy) आणि सौ. सावित्रीबाई व श्री. वामनराव सोमाजी कोकरे यांची नात व सौ. विद्या व श्री. भानुदास वामनराव कोकरे रा. पणदरे, ता. बारामती, यांची सुकन्या चि. सौ. कां. अस्मिता (M. A. Psychology) यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. २८/७/२०२४ रोजी दुपारी १२ वा. ३१ मि. या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, 61 फाटा, माळशिरस-अकलूज रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तरी या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना अक्षतारुपी शुभ आशीर्वाद देण्याची नम्र विनंती सौ. रेश्मा व श्री. आनंतराव विठ्ठल ठवरे पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याची विनंती ठवरे पाटील परिवार व कोकरे परिवार यांच्यावतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.