ताज्या बातम्या

धानोरे येथील सौ. सखुबाई दत्तू देवकते यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.


वेळापूर येथील सतीश क्लिनिकचे डॉ. आबासाहेब देवकते यांना मातृषोक..

वेळापूर (बारामती झटका)

धानोरे ता. माळशिरस, येथील सौ. सखुबाई दत्तू देवकते यांचे वयाच्या 87 व्या वर्षी शनिवार दि. 17/08/2024रोजी सकाळी 06 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, तीन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. वेळापूर येथील सतीश क्लिनिकचे डॉ. आबासाहेब देवकते यांच्या मातोश्री होत्या.. त्यांच्यावर 22 फाटा येथील राहत्या घराशेजारील शेतामध्ये आजच सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

सौ .सखुबाई यांना बाई या टोपण नावाने सर्व ओळखत होते. त्यांचा सुसंस्कृत स्वभाव असून त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. प्रतिकूल परिस्थितीत पती-पत्नी व मुले यांनी अपार कष्ट, जिद्द व चिकाटीने संसार फुलविलेला होता.

बाईंच्या दुःखद निधनाने देवकते परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. देवकते परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि बाईंच्या मृतात्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button