बांगर्डे येथील प्रवीण वाघमोडे, पांडुरंग किसवे, पांडुरंग दडस यांच्यावर नातेपुते येथे गुन्हा दाखल….

बांगर्डे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन लक्ष्मण गोरे यांची शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार दाखल…
नातेपुते (बारामती झटका)
बांगर्डे ता. माळशिरस ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन लक्ष्मण गोरे यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे प्रवीण वाघमोडे, पांडुरंग किसवे आणि पांडुरंग दडस (सर्व राहणार बांगर्डे, ता. माळशिरस) यांच्याविरुध्द तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुरनं 284/2024 BNS=2023 132,121,351(2),351(3),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
नातेपुते पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडी, बांगर्डे येथील जिल्हा परिषद शाळेला पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेले रंग देण्याचे कामास अडथळा केले. तसेच बांगर्डे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन विकासाची कामे तुम्ही कोणाला विचारून चालू केली असे म्हणून शासकीय दस्तऐवज असलेले रजिस्टर नंबर 8 फिर्यादीचे हातातून हिसकावून घेऊन त्यांना धक्काबुक्की करून रजिस्टरमधील छापील लिहिलेली दोन पाने फाडून कार्यालयात परत गावाचे विकासाचे कोणतेही कामकाज आम्हाला विचारल्याशिवाय करायचे नाही, असे म्हणून धमकी, दमदाटी करून सरकारी कामात अटकाव करून अडथळा केला आहे. असे नमूद करण्यात आले आहे.

बारामती झटका यूट्यूब चॅनल यांनी सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ बारामती झटका कट्टा सुरू केलेला आहे. सदरच्या कट्ट्यावर प्रवीण वाघमोडे, पांडुरंग किसवे, पांडुरंग दडस या तिघांकडून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली जाईल. संपर्क श्रीनिवास कदम पाटील संपादक बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल संपर्क 98 50 10 49 14 धन्यवाद..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.