अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थिनी कु. सृष्टी रणदिवे हिचे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थिनी कु. सृष्टी दशरथ रणदिवे हिने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये झालेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत ‘निर्मुलन अंधश्रध्देचा, जागर विवेकाचा’ या विषयावर आपले प्रभावी वक्तृत्व दाखवून आठवी ते दहावी या मोठ्या गटामध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. सृष्टी दशरथ रणदिवे हिने सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.


तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य डी. टी. मोहिते, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बाबासाहेब क्षीरसागर, सज्जनराव पवार, संग्रामसिंह पवार, माजी सरपंच काकासाहेब पवार, विद्यमान सरपंच पांडुरंग येळवे यांनी तिचे अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.