ताज्या बातम्या

माळशिरस येथे युनिव्हर्स कन्स्ट्रक्शनचा भव्य दिव्य थाटामाटात उद्घाटन समारंभ होणार….

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस शहरामध्ये प्रथमच सर्व सोयी सुविधाने परिपूर्ण असे युनिव्हर्स कंट्रक्शनचा भव्य दिव्य थाटामाटात गुरुवार दि. 03/10/2024 रोजी सकाळी 10 वाजता एचडीएफसी बँक, स्टार आयसीयु हॉस्पिटलवरती म्हसवड रोड, माळशिरस येथे उद्घाटन समारंभ होणार आहे.

कण्हेर ता. माळशिरस, येथील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबांमधील सचिन दशरथ शेंडगे यांनी प्रतिकूल परिस्थितीत बी.ई. सिव्हील इंजिनिअर डिग्री पूर्ण केली. आपल्या शिक्षणाचा व कन्स्ट्रक्शनचा ग्रामीण भागातील लोकांना फायदा व्हावा, या उदात्त हेतूने ज्या ग्रामीण भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची जडणघडण झाली त्याच परिसरामध्ये युनिव्हर्स कन्स्ट्रक्शन सुरू करीत आहेत. त्यामध्ये बिल्डिंग प्लॅनिंग वास्तू शास्त्रानुसार, बिल्डिंग परमिशन, स्ट्रक्चरल डिझायनर, साईट सुपर व्हिजन, थ्रीडी एलिव्हेशन, इस्टिमेट, प्लॉटिंग, स्टील डिझायनर, एनऐ लेआउट, इंटेरियर डिझायनिंग अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत.

धकाधकीच्या व धावपळीच्या युगात मनुष्यबळाची कमतरता असणाऱ्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युनिव्हर्स कन्स्ट्रक्शन मटेरियल सहित बांधकाम करून देण्याच्या सुविधा उपलब्ध करणार आहेत. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन युनिव्हर्स कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सचिन दशरथ शेंडगे आणि समस्त शेंडगे परिवार, कण्हेर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button