कण्हेर येथील चिरंजीव शिवतेज नाथाआबा पाटील याचा मृत्यू…

कण्हेर येथील पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला…
कण्हेर (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस, येथील चिरंजीव शिवतेज नाथाआबा पाटील याचा गुरुवार दि. 03/10/2024 रोजी वयाच्या पाचव्या वर्षी आकस्मित मृत्यू झालेला आहे. चिरंजीव शिवतेज याच्या ह्रदय हेलावणाऱ्या मृत्यूने पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. 05/10/2024 रोजी सकाळी 07 वाजता होणार आहे.
माळशिरस तालुक्यात सर्वात मोठे कुटुंब पाटील परिवार यांचे आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादास भाऊ पाटील यांचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय माधवराव माणिकराव पाटील यांचा नातू व राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ पाटील यांचा पुतण्या नाथाआबा पाटील यांचा मुलगा स्व. चिरंजीव शिवतेज अतिशय खेळकर व गुणी मुलगा होता. त्याच्या आकस्मित मृत्यूने पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
पाटील परिवाराला दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय शिवतेज याच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.