कामात सातत्य असेल तर नॅक मूल्यांकन सोपे जाते – डॉ. सुरेश पाटील

संग्रामनगर (बारामती झटका)
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर पुरस्कृत परिस स्पर्श या योजने अंतर्गत अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने मेंटी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरची कार्यशाळा ज्या महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झालेले नाही त्यांच्या नॅकसंबंधी अडचणी जाणून घेऊन नॅक मुल्यांकन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली होती.

या कार्यक्रमात डॉ. सुरेश पाटील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर परिस स्पर्श योजनेचे सातारा जिल्ह्याचे सचिव व इंग्रजी विभागप्रमुख, कला व वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे सातारा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय अकलूज, ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अकलूज, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अकलूज, समीर गांधी कला महाविद्यालय माळशिरस व प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय करमाळा येथील प्राचार्य, नॅक समन्वयक तसेच मेंटॉर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर यांनी भूषविले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. सतीश देवकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रविराज सोनवणे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आप्पासाहेब बाबर यांनी केले. ही एकदिवसीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल दत्तात्रेय पाटील, कार्यालयीन प्रबंधक राजेंद्र बामणे व अधीक्षक युवराज मालुसरे यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
https://neighbourhood-london.com/
Uydu servisi Malatya Uyducu Malatya, işlerini çok titiz yapıyor, oldukça memnun kaldım. https://sparissimo.community/read-blog/1217
Thinker Pedia Very well presented. Every quote was awesome and thanks for sharing the content. Keep sharing and keep motivating others.
ld3xj3
Mangaclash I just like the helpful information you provide in your articles
Strands Hint Good post! We will be linking to this particularly great post on our site. Keep up the great writing
Lois Sasson I very delighted to find this internet site on bing, just what I was searching for as well saved to fav