ताज्या बातम्या

शंकरनगर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक दत्तात्रय इंगवले देशमुख यांचे दुःखद निधन

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस, येथील शंकरनगर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक दत्तात्रय मारुती इंगवले देशमुख (वय ६८) यांचे आज मंगळवार दि. २२/१०/२०२४ रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, नातू, २ विवाहित मुली, ४ विवाहित बहिणी, १ भाऊ असा परिवार आहे.

पुणे येथील प्रसिद्ध बिल्डर मोहनराव इंगवले देशमुख यांचे ते मोठे बंधू होत. लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे ते खंबीर समर्थक होते.

दत्तात्रय इंगवले देशमुख यांच्या दुःखद निधनाने इंगवले देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर इंगवले देशमुख परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो आणि स्वर्गीय दत्तात्रय इंगोले देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. Keep up the fantastic work! Kalorifer Sobası odun, kömür, pelet gibi yakıtlarla çalışan ve ısıtma işlevi gören bir soba türüdür. Kalorifer Sobası içindeki yakıtın yanmasıyla oluşan ısıyı doğrudan çevresine yayar ve aynı zamanda suyun ısınmasını sağlar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button