लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची भाजप पक्षाकडून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले….
पिलीव येथील आमदार राम सातपुते समर्थक यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करीत एकमेकांना पेढे भरविले…
पिलीव (बारामती झटका)
महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माळशिरस विधानसभा २५४ अनुसूचित जाती राखीव मतदार संघामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना महायुतीकडून पुनश्च उमेदवारी देण्याचे निश्चित झालेले असल्याने माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आमदार राम सातपुते समर्थक यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करीत एकमेकांना पेढे भरविले.
यावेळी युवा नेते राहुल मदने, प्रमोद भैस, विठ्ठल करंडे, संकेत देशमुख, नितीन मोहिते, सागर बगाडे, बाळू जनवर, गणेश देशमुख, मयूर भैस, स्वप्नील सावळजकर, संजय पाटील आदींसह भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Ümraniye süpürge onarım hizmeti Parça değişiminden sonra süpürgem çok güçlü çalışıyor. https://aipair.io/read-blog/1838