शिवाजीराजे कांबळे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार…
स्वगृही आ. बबनदादा शिंदे गटात प्रवेश; रणजीतसिंह शिंदे यांना पाठिंबा
माढा (बारामती झटका)
आमदार बबनदादा शिंदे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व क्रियाशील कार्यकर्ते आणि माढा तालुक्यातील एक वादळी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व शिवाजीराजे अंबादास कांबळे यांनी आपला विधानसभा निवडणुकीसाठी भरलेला अर्ज दि. ४ नोव्हेंबर रोजी परत काढून घेतला आहे. त्यांनी यापुढे आ. बबनदादा शिंदे व रणजीतभैय्या शिंदे यांच्या शिंदे गटाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या या निर्णयामुळे माढा तालुक्यामध्ये सर्वत्र हर्ष, उल्हास व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवाजीराजे अंबादास कांबळे हे माढा तालुक्यातून कुर्डू, मोडनिंब, बेंबळे, या जिल्हा परिषद गटातून २० वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते. तसेच जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागाचे सभापती होते. आमदार बबनदादा शिंदे यांचे ते अतिशय कट्टर समर्थक, संजयमामा शिंदे यांचे मित्र आणि लोकप्रिय, समाजप्रिय आणि सर्वसामान्य जनतेतील मनमिळावू कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी किरकोळ मतभेदावरून त्यांनी आ. बबनदादा शिंदे गटाची साथ सोडून कार्यकर्त्यांचा स्वतंत्र गट निर्माण केला होता.
सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना जिल्ह्यातील व राज्यातील अनेक नेते मंडळींनी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवली होती परंतु, शिवाजीराजे कांबळे यांनी ४ नोव्हेंबर रोजी आपली विधानसभेची अपक्ष उमेदवारी परत घेऊन आपल्या मूळ स्वगृही आमदार बबनदादा शिंदे गटामध्ये स्वेच्छेने व आनंदाने प्रवेश करून रणजीतभैया शिंदे यांना भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या निर्णयाचे माढा तालुक्यात, तसेच दादा-मामा-भैय्या व शिंदे घराण्यावर प्रेम करणाऱ्या हजारो-लाखो कार्यकर्त्यांनी अतिशय आनंदाने स्वागत केले आहे.
शिवाजीराजेंच्या या निर्णयामुळे रणजीतसिंह बबनराव शिंदे उर्फ भैय्यासाहेब यांना विधानसभेच्या निवडणूकीत त्यांची अतिशय मोलाची साथ मिळणार ही “काळ्या दगडावरची रेघ” आहे. शिवाजीराजे कांबळे यांचे नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व हे अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय आहे. शिवाजीराजे कांबळे म्हणजे ‘मुलुख मैदानी तोफ’ असून आता ही तोफ जेव्हा रणजीत भैय्यांच्या प्रचारामध्ये धडाडेल त्यावेळेस माढा मतदारसंघातील व सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील जनता उत्स्फूर्तपणे म्हणेल “वा… राजे… वा….”
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Smartcric This is my first time pay a quick visit at here and i am really happy to read everthing at one place