श्रीपुर येथील जालिंदर निवृत्ती नाईकनवरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
पत्रकार दत्ता नाईकनवरे यांना पितृशोक.
श्रीपुर (बारामती झटका)
श्रीपुर ता. माळशिरस, येथील जालिंदर निवृत्ती नाईकनवरे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. गुरुवार दि. ०७/११/२०२४ रोजी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार दत्ता नाईकनवरे सरांचे वडील होते.
जालिंदर नाईकनवरे यांनी श्री चंद्रशेखर विद्यालय येथे इमाने इतबारे सेवा करून सध्या ते सेवानिवृत्त झाले होते. स्वर्गीय जालिंदर नाईकनवरे यांच्या आत्म्यास शांती लाभो व नाईकनवरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
“This article is really informative and well-written!”