माढा विधानसभा अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांची प्रचारात आघाडी – बी. टी. शिवशरण ज्येष्ठ पत्रकार
श्रीपूर (बारामती झटका)
माढा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. महाळुंग मंडळमधील चौदा गावांत उमेदवार रणजितसिंह शिंदे यांचा होम टू होम प्रचार त्यांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने करत आहेत. त्यांची निशाणी सफरचंद असून हे चिन्ह घरोघरी मतदारांपर्यंत पोहचवण्याचे काम आमदार बबनदादा शिंदे यांचे शेकडो समर्थक, कार्यकर्त्यांनी केले आहे.
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीला गेल्या दोन वर्षांत ३७ कोटी विकास निधी उपलब्ध करून दिल्याने या भागातील विकासकामे मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळेच उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. रणजितसिंह शिंदे हे मनमिळाऊ व सर्वांना बरोबरीने घेऊन जाणारे उमदे नेतृत्व आहेत. राजकारण कमी व विकासाला प्राधान्य जास्त देण्याची, त्यांच्या कामाची पध्दत राहिली आहे. ते आपल्या प्रचारात बोलताना कधीही खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषा वापरत नाहीत. संयमी, सोशीक भुमिका घेतात.
आमदार बबनदादा शिंदे यांनी विकासाचा जो मार्ग आखला आहे, त्या मार्गावरून या मतदारसंघात पुढेही जनतेची विकासकामे प्रामाणिकपणे करू, असे त्यांचे धोरण आहे. माढा विधानसभा मतदारसंघात त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही विकासाचा प्रश्न, जनतेचा विश्वास यांवर निवडणूक जिंकणार, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. माढा विधानसभा मतदारसंघात त्यांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे. शिवराळ भाषा बोलून फसव्या घोषणा, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणारांना सुज्ञ व जागरूक मतदार चारीमुंड्या चित करून घरी पाठवतील, असे ते प्रचारात ठासून सांगत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.