ताज्या बातम्याराजकारण

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करा -जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत.

सांगोला (बारामती झटका)

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांनी केलेली आहे. सदरच्या पत्राची प्रत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. मकरंदजी देशपांडे यांना देण्यात आलेली आहे.

सदरच्या पत्रामध्ये, श्री. रणजीतसिंह मोहिते पाटील विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य मुंबई यांची भारतीय जनता पार्टीने विधान परिषद सदस्य पदी नियुक्ती केलेली होती. परंतु, आत्ता झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 या सार्वत्रिक निवडणुकीत माळशिरस 254 विधानसभेतील महायुती मधील भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. राम विठ्ठल सातपुते यांच्या विरोधात प्रचार करून कार्यकर्ते व मतदारांना महायुतीमधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात मतदान करण्यास प्रोत्साहित केलेले आहे. तरी श्री. रणजीतसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, असे पत्र जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिलेले असल्याने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button