“बारामती झटका इफेक्ट” सीनियरिटी वगळून वरिष्ठ केलेले बँक इनस्पेक्टर यांना दे धक्का.. तर, सीनियरिटीने एस. एम. खंडागळे यांना संधी मिळाली…
जिल्हा मध्यवर्ती बँकेत “वरमाई शिंदळ तर वराडाचं काय”, अशी अवस्था प्रशासक व अधिकाऱ्यांची झालेली आहे…. बातमीने जिल्हा बँक खडबडून जागी झाली….
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या प्रशासक आहे. बँकेच्या संचालक मंडळाने अनियमित कर्ज वाटप केलेले असल्याने त्यांच्यावर एकीकडे कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असून जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सहकारामध्ये पदाधिकारी असतील तरच अधिकारी व कर्मचारी जबाबदारीने काम करतात मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक यांचा बेकायदेशीर व मनमानी कारभार सुरू आहे.
सीनियरिटी वगळून सीनियर बँक इन्स्पेक्टर एका आप्पाला केलेले असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत वरमाईचं शिंदळ तर, वराडाचं काय.., अशी अवस्था प्रशासक व अधिकाऱ्यांनी केलेली आहे. अशी बातमी प्रसारित झाल्यानंतर सोलापूर जिल्हा बँकेत खळबळ उडालेली होती. जिल्हा बँकेत सीनियरिटी वगळून वरिष्ठ बँक इन्स्पेक्टर नेमणूकीच्या पदावर नातेपुते शाखेत कार्यरत असणारे शाखा अधिकारी एस. एम. खंडागळे यांना पदोन्नती मिळून सीनियर बँक इन्स्पेक्टर माळशिरस अकलूज विभाग यांच्याकडे नियुक्तीने पदभार दिलेला आहे. जिल्हा बँकेच्या पदोन्नतीमध्ये 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर 68 कर्मचाऱ्यांच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अंतर्गत शाखेत बदल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शिंदे यांच्या स्वाक्षरीने झालेल्या आहेत.
बारामती झटका वेब पोर्टल, सदरच्या बातमीमध्ये
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आप्पा यांचा बोलबाला जोरात दिसत आहे. एक आप्पा अक्कलकोट दर्शनाला गेले तर दुसऱ्या आप्पाचे बेकायदेशीर सीनियर बँक इन्स्पेक्टर पदावर दर्शन दिसलेले आहे. प्रशासक जरी असले तरी त्यांच्यावर सहकार खात्याचा निर्बंध असतोच मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी व नेतृत्व यांच्या कृपाशीर्वादाने जिल्हा बँकेतील प्रशासक यांनी बेकायदेशीर सीनियर बँक इन्स्पेक्टर यांची नेमणूक करून अधिकाराचा गैरवापर केलेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे विशेष लक्ष देऊन सुरुवात वरमाईपासून करावी, त्यामुळे बेकायदेशीर केलेली निवड रद्द करावी, अशी बातमी प्रसारित केलेली होती. पदोन्नती नुसार श्री. एस. एम. खंडागळे यांना सीनियर बँक इन्स्पेक्टर पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक असा ‘उत्तम” आहे, ज्यांनी बँक इन्स्पेक्टर असताना फ्रॉड केलेला आहे. दि. 31/05/2024 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना पुन्हा सेवेमध्ये घेतलेले आहे. याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक अनियमितता करण्यामध्ये जेवढे दोषी आहेत तेवढेच, प्रशासनातील अधिकारी सुद्धा. आपले कोण वाकडे करीत नाही, अशा अविर्भावात असणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी अशी सभासद, शेतकरी, ठेवेदार यांच्याकडून मागणी होत होती. सोलापूर जिल्ह्यातील 68 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यामध्ये माळशिरस तालुक्यात अंतर्गत शाखांबरोबर तालुक्याच्या बाहेर सुद्धा माळशिरस तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. पदोन्नती व बदल्या 79 झालेल्या आहेत त्यामध्ये अनेकजण खुश आहेत तर काही नाराज आहेत. खुशी आणि गम जिल्हा बँकेत पाहायला मिळत आहे. पदोन्नती होऊन सुद्धा अनेक नाराज आहेत बदली झाल्याने अनेकांची गोची झालेली आहे. बदल्या झालेल्या असल्याने शेतकरी सभासद यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.