पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांनी माळशिरस तालुक्यातील घनकचरा संकलन करणाऱ्या इलेक्ट्रिक ट्राय सायकलचे पूजन करावे.
माळशिरस तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींनी इलेक्ट्रिक ट्रायसायकल खरेदीसाठी मान्यता घेतलेली आहे तर 14 ग्रामपंचायतींनी प्रत्यक्ष खरेदी केलेली आहे…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माळशिरस तालुक्यात आवर्जून दौरा करून पंचायत समिती माळशिरस अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेतून 55 ग्रामपंचायतींनी इलेक्ट्रिक ट्राय सायकल मान्यता घेतलेली आहे. त्यापैकी 14 ग्रामपंचायतींनी खरेदी केलेली आहे. सदरच्या ट्राय सायकलचे दिवाळी, दसरा मुहूर्त असताना सुद्धा पूजन केलेले नाही. सध्या योगायोगाने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्याकडे पालकमंत्री जबाबदारीसुद्धा आलेली असल्याने सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माळशिरस तालुक्यात आवर्जून दौरा करून घनकचरा संकलन करणाऱ्या इलेक्ट्रिक ट्राय सायकलचे पूजन करावे, असे प्रस्थापित सत्ताधारी ग्रामपंचायतीच्या विरोधी गटातील सदस्य व ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
माळशिरस पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेतून ट्राय सायकल खरेदीच्या वेळी 70 + 30 टक्के असे अंदाजपत्रक तयार केलेले होते. सदरचे अंदाजपत्रक यांत्रिक विभाग सोलापूर यांच्याकडून न करता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग माळशिरस येथील शाखा अभियंता व उपअभियंता यांनी अधिकार नसताना अंदाजपत्रक व मूल्यांकन करून चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. सदरच्या चुकीच्या पद्धतीच्या अंदाजपत्रकावर तत्कालीन श्री. गुळवे गटविकास अधिकारी व तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी ट्राय सायकल खरेदी कागदावरच दाखवून शासनाच्या पैशाचा अपहार व अनियमितता केलेली आहे. 14 ग्रामपंचायतीमध्ये जनतेच्या मुलाखती घेतल्यानंतर ट्राय सायकल गावात कधीच फिरली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केलेला होता. त्यांनी सदर बाबतीत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पाठवलेला होता. गटविकास अधिकारी यांनी, ज्यांनी या योजनेमध्ये घोटाळा केला, त्यांच्याकडेच चौकशी दिलेली होती. सदरची बाब निदर्शनास आणल्यानंतर दुसरे चौकशी अधिकारी नेमले. त्यामध्ये उपअभियंता लघुपाटबंधारे यांनी जबाबदारी नाकारून चौकशी केलेली नाही. सदरची चौकशी जे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी म्हणून काम केलेले आहे व सध्या विस्तार अधिकारी म्हणून माळशिरस पंचायत समितीमध्येच कार्यरत असणारे श्री. सावळजकर यांच्याकडे चौकशीची जबाबदारी दिलेली होती. सावळजकर यांनी आपल्या सोयीनुसार चौकशी अहवाल दिलेला आहे. यामध्ये अनियमितता व अपहार दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत, हे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी यांनी सखोल तपासणीचे कामकाज करणे गरजेचे आहे, तोपर्यंत ट्राय सायकल पालकमंत्री यांनी पूजन करावे असा सूर माळशिरस तालुक्यातील जनतेमधून येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.