जयाभाऊ यांनी माण-खटावमधील दुष्काळमुक्तीची लढाई अथक प्रयत्नांनी अंतिम टप्प्यात आणली – सौ. सोनिया जयकुमार गोरे
डंगिरेवाडीच्या घारकडा तलावासाठी साडेसहा कोटींचा निधी; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचे प्रयत्न..
डंगिरेवाडी (बारामती झटका)
डंगिरेवाडी, थदाळे आणि मोहीच्या सरहद्दीवरील घारकडा पाणीसाठवण तलावाच्या पुनर्भरण आणि दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणी सदस्या, श्री सिध्दनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब), सातारा जिल्हा मा. जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण (आबा) गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कामासाठी ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ६ कोटी ५९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
घारकडा तलाव मोही, थदाळे, डंगिरेवाडीसह शिंगणापूर हद्दीतील करपे वस्ती परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या तलावाची डागडुजी करण्याची मागणी केली जात होती. मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जलसंधारण महामंडळाकडून तलाव दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल सहा कोटी ५९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ सौ. सोनिया गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विनोद बोराटे, उपअभियंता वैभव बरवे, अमित विधाते, सरपंच परवीन मुलाणी, ज्ञानदेव जगदाळे, बापूराव देवकर, साहेबराव भगत, रोहित बोराटे, सचिन बोराटे, सोमनाथ जाधव, रामदास कुंभार, अजिंक्य शिंगाडे तसेच परिसरातील शेतकरी, महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सोनिया गोरे म्हणाल्या, मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी माण-खटावमधील दुष्काळमुक्तीची लढाई अथक प्रयत्नांनी अंतिम टप्प्यात आणली आहे. सुरुवातीला साखळी सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती करुन आणि मतदारसंघातील पाझर तलावांची दुरुस्ती करुन दुष्काळमुक्तीच्या लढाईची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर उरमोडी, जिहेकठापूर, तारळी आणि आता टेंभू पाणीयोजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. घारकडा तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. या कामासाठी मोठा निधी मिळून कामही सुरु करण्यात आल्याने शेतकरी, महिला भगिनींना पाणी टंचाईवर मात करता येणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.