फोंडशिरसचे ग्रामदैवत श्री बाणलिंगाच्या नगरीत लोकप्रिय दमदार राम सातपुते यांचे जंगी स्वागत…

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांच्या भव्य जंगी मैदानात आरोग्यदूत राम सातपुते यांचा सन्मान माजी उपसरपंच उमाजी बोडरे यांनी केला, अनेकांच्या भुवया उंचावल्या…
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस, ता. माळशिरस गावचे ग्रामदैवत श्री बाणलिंगाच्या नगरीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत हलगीच्या कडकडाटात जंगी स्वागत करण्यात आले.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांच्या भव्य जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या मैदानात आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी शेंडेवाडी, फोंडशिरस सोसायटीचे व्हाईस चेअरमन व फोंडशिरस ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ज्येष्ठ नेते उमाजी बोडरे यांच्या शुभहस्ते कुस्ती मैदानात सन्मान करण्यात आला. यावेळी फोंडशिरस गावचे विद्यमान सरपंच पोपटराव बोराटे, उपसरपंच दादा शिवाजी रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील गोरे, अक्षय गोरे, शंकर बोडरे, हरी पाटील, वैभव रणदिवे, तेजस गोरे, मनोज जाधव, हेमंत बोडरे, बजरंग ढवळे, लखन रणदिवे, नागेश बोडरे, सचिन बोराटे, शिवाजी सर्जे, अमोल ढोपे, दादा ढोबळे, राहुल खिलारे, वाल्मीक रणदिवे, नितीन ढवळे, सुरज भिसे, अमोल ढोबळे, हरी रणदिवे, गणेश बोडरे, नितीन मदने, अशोक बंडगर, सुनील पाटील, सतीश पाटील, बशिर मुलाणी, संतोष रणदिवे, बजरंग ढोबळे, यांच्यासह कुस्ती शौकीन, ग्रामस्थ, पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते मैदानामध्ये कुस्ती लावण्यात आली. फोंडशिरस पंचक्रोशीमध्ये ज्येष्ठ नेते उमाजी बोडरे यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रात सिंहाचा वाटा असतो. आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा मैदानात सन्मान केल्याने मैदानातील व मैदानाच्या बाहेरील अनेकांच्या भुवया उंचावल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.