मुंबई पोलीस चि. सौ. कां. स्वप्नाली जाधव, मळोली व चि. बालाजी पाटोळे, अकुंबे यांचा शुभविवाह संपन्न होणार…

प्रेषक
श्री. सचिन दिलीप जाधव
श्री. पंढरीनाथ हनुमंत जाधव
मळोली (बारामती झटका)
स्वर्गीय किसन नाना जाधव यांची नात व स्वर्गीय दिलीप किसन जाधव, रा. मळोली, ता. माळशिरस यांची कनिष्ठ सुकन्या मुंबई पोलीस चि. सौ. कां. स्वप्नाली व स्वर्गीय सिताराम तुळशीराम पाटोळे यांची यांचे नातू व श्री. भास्कर सिताराम पाटोळे रा. आकुंभे, ता. माढा, यांचे ज्येष्ठ सुपूत्र चि. बालाजी यांचा शुभविवाह सोहळा बुधवार दि. 30/04/2025 रोजी दुपारी 02 वाजून 46 मिनिटे या शुभमुहूर्तावर श्री गणेश मंगल कार्यालय, वेणेगाव, पुणे-सोलापूर हायवे रोड, ता. माढा, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे प्रेषक श्री. सचिन दिलीप जाधव व श्री. पंढरीनाथ हनुमंत जाधव आणि समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये मराठमोळ्या वातावरणात आई तुळजाभवानीच्या शीतल छायेत कुलदैवत खंडोबाच्या आशीर्वादाने व आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत असे आपले स्नेहांकित गं. भा. कुसुम दिलीप जाधव, गं.भा. चंचला हनुमंत जाधव, सौ. सुशीला व श्री. दत्तात्रेय किसन जाधव आणि समस्त जाधव परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे जाधव, पाटोळे, मदने, भाकरे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.