राज्यमंत्री योगेश कदम यांचा मुंबई, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हा दौरा जाहीर

सोलापूर (बारामती झटका)
ना. श्री. योगेश कदम, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचा मुंबई, अहिल्यानगर आणि सोलापूर दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदरचा दौरा पुढीलप्रमाणे –
मंगळवार दि. ०६.०५.२०२५ सकाळी ०८.४५ वा. शासकीय विश्रामगृह, पुणे येथूण लोणी काळभोर- भिगवण-कर्जत मार्गे मोटारीने (एमएच ०२ जीएम ०००९ डिफेंडर) चौंडी, अहिल्यानगरकडे प्रयाण, दुपारी १२.०० वा चौंडी, अहिल्यानगर येथे आगमन, दुपारी १२.३० ते ०३.३० वा. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर मंत्री परिषदेच्या बैठकीस उपस्थिती (स्थळ – मौजे चौंडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.), दुपारी ०३.४५ वा. युवासेना पदाधिकारी यांच्या समवेत भेट (स्थळ-चौंडी, चापगाव रोड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.), संदर्भ – श्री. सोमनाथ शिंदे पाटील, युवा सेना, ता. प्रमुख कर्जत, जि. अहिल्यानगर, दुपारी ०४.०० वा. चौंडी, अहिल्यानगर येथून शासकीय विश्रामगृह, सोलापुर कडे प्रयाण, सायं ०७.०० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापुर येथे आगमन व मुक्काम असा असणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.