ताज्या बातम्यासामाजिक

चि. आकाश शिंदे, माळशिरस आणि चि. सौ. कां. गायत्री पिसे, पिसेवाडी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.

प्रमुख उपस्थिती
ना. जयकुमार गोरे
ग्रामविकास तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा.
रामभाऊ सातपुते
मा. आ. माळशिरस विधानसभा.
ॲड. मिलिंद कुलकर्णी
व्हॉईस चेअरमन, श्री शंकर स. सा. का. लि‌. सदाशिवनगर.
डॉ. आप्पासाहेब देशमुख
मा. नगराध्यक्ष माळशिरस नगरपंचायत.

प्रेषक
श्री. पांडुरंग तुकाराम शिंदे.
श्री. बबन (दादा) धोंडीराम शिंदे
चेअरमन, श्री संत सावता माळी विकास सेवा संस्था माळशिरस
मा. उपसरपंच ग्रामपंचायत माळशिरस.

माळशिरस (बारामती झटका)

स्वर्गीय धोंडीराम मल्हारी शिंदे यांचे नातू व श्री. बबन (दादा) धोंडीराम शिंदे रा. माळशिरस, ता. माळशिरस, यांचे सुपुत्र चि. आकाश आणि स्वर्गीय शंकर दादू पिसे यांची नात व श्री. कुंडलिक शंकर पिसे रा. पिसेवाडी, ता. माळशिरस, यांची सुकन्या चि. सौ. कां. गायत्री यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 10/05/2025 रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटे या शुभमुहूर्तावर श्री संत सावता माळी मंगल कार्यालय, माळशिरस येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ विठ्ठल सातपुते, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद विष्णुपंत कुलकर्णी, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लग्न सोहळा संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक श्री. पांडुरंग तुकाराम शिंदे, श्री बबन (दादा) धोंडीबा शिंदे चेअरमन, संत सावता माळी विविध कार्यकारी सेवा सोसायटी माळशिरस, माजी उपसरपंच ग्रामपंचायत माळशिरस यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

अग्नि नारायणाच्या साक्षीने, रेशमाच्या बंधनात, वाद्यांच्या गजरात व सनईच्या मधुर सुरात संपन्न होत आहे. अशा पवित्र मंगल क्षणी शुभ आशीर्वादाची उधळण करून सहकुटुंब सहपरिवार उपस्थितीचा लाभ द्यावा. आपले स्नेहांकित सौ. मुक्ताबाई व श्री. बुवा मल्हारी शिंदे यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे माळशिरस नगरपंचायत नगरसेविका सौ. राणीताई बबन (दादा) शिंदे व समस्त शिंदे परिवार माळशिरस यांच्या वतीने शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom