Uncategorizedताज्या बातम्यासामाजिक

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शाहिरी शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शाहिरी शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी व युवा शाहीर पृथ्वीराज माळी यांचा पोवाडा प्रथमच माळशिरस मध्ये शहा धारशी प्लॉट, गाडीतळ माळशिरस, पुणे पंढरपूर रोडवर संपन्न होणार आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवार दि. 14/05/2025 रोजी धर्मवीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी 07 वाजता शाहीर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रौद्र शंभू प्रतिष्ठान माळशिरस यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. यंदाचे तिसरे वर्ष आहे. रौद्र शंभू प्रतिष्ठानच्या वतीने शाहिरी कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी “यायलाच लागतंय” असे नम्र आवाहन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button