क्रीडाताज्या बातम्यासामाजिक

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये अमरसिंह पराडे पाटील याने ब्रांस पदक मिळवून बाभुळगावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

बाभुळगाव (बारामती झटका)

दि. 10 मे रोजी नेपाळ (काठमांडू) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कु. अमरसिंह लालासाहेब पराडे पाटील बाभूळगाव, ता‌. माळशिरस याने ५० किलो वजनी गटात ब्रांस पदक प्राप्त करून बाभुळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्येही त्याची निवड करण्यात आली आहे.

चि. अमरसिंह पराडे याला पुजा पाटील मॅडम (कोल्हापूर) आणि अक्षय पाटील सर यांचे प्रशिक्षण मिळाले तर मार्गदर्शक रमेश पिसाळ सर सुषमा पिसाळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

चि. अमरसिंह पराडे यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांच्यावर पंचक्रोशीतून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button