पंढरीच्या पावन नगरीत शिवस्वराज्य युवा संघटनेचा शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न – संदिपराजे मुटकुळे-पाटील

पंढरपूर (बारामती झटका)
शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने देण्यात येणारा शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळा संपन्न करण्यात आला असून रविवार दि. १८/०५/२०२५ रोजी ठिक ०७ वाजता येथील योग भवन एलआयसीच्या पाठीमागे पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. ह. भ. प. गुरुवर्य देवव्रत (राणा) महाराज वासकर,पंढरपूर उपनगराध्यक्ष नागेश (काका) भोसले, शिवसेना जिल्हा संघटक युवानेते मा. संजय (भाऊ) बंदपट्टे उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी छत्रपती मराठा सेना संस्थापक अध्यक्ष महेश डोंगरे-पाटील, मराठा क्रांती समन्वयक गुरसाळे गावचे युवानेते रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे दिपक वाडदेकर, नगरसेवक सुनिल डोंबे, नगरसेवक महादेव धोत्रे, मराठा सेवक शंकर सुरवसे, संदीप आबा पाटील, शिवसेना युवा शहरप्रमुख विश्वजीत भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, भैय्यासाहेब कळसे, साईनाथ बडवे, किरण शहा, रविंद्र कोळी, रणजित बागल, सतिश शिंदे, नागेश दादा कदम, नगरसेवक कृष्णा वाघमारे, भिमशक्ती ग्रुप अध्यक्ष उमेश सर्वगोड, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोदराज लटके, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित (लाला) पानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर (आबा) भोसले, आय काँग्रेस पक्षाचे युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे, शिवसेना शिंदे गट पंढरपूर युवा शहरप्रमुख सुमित शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना दत्तात्रय जगताप, संतोष बंडगर, संपत सर्जे, शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मोहन बागल आणि शिवस्वराज्य युवा संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळा संपन्न करण्यात आला असून तसेच पुरस्काराचे मानकर्यांना सन्मानित करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी म्हटले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.