ताज्या बातम्यासामाजिक

नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील गहाळ व चोरी झालेले १६ मोबाईल असे एकुण ३,२०,०००/- रु. किंमतीचे मोबाईल मुळ फिर्यादीस केले परत

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते पोलीस ठाणेस नातेपुते पोलीस ठाणे परिसरात चोरीस गेलेले व गहाळ झालेले वेगवेगळया कंपनीचे एकूण १६ मोबाईल ज्याची किंमत ३,२०,०००/- किंमतीचे मूळ फिर्यादीस परत देण्यात आलेले आहे. सदर मोबाईल जप्त करण्यासाठी पोकों/ ५३२ रणजित मदने, नातेपुते पोलीस ठाणे, पोकों रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर यांनी तांत्रिक विश्लेशन करुन वरील प्रमाणे मोबाईल जप्त केलेले आहेत.

मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सो., सोलापुर ग्रा., मा. श्री. प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा., श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो. अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे भव्य प्रांगणात समारंभपूर्वक वरिल सर्व गुन्ह्यातील फिर्यादी यांना बोलावुन घेवुन त्यांना मोबाईल परत करण्यात आले. त्यावेळी नातेपुते पोलीस ठाणेचे श्री. महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, पोहेकों राहूल रूपनवर, पोहेकों राहुल रणनवरे, पोना राकेश लोहार, पोना अमोल वाघमोडे, पोकॉ रणजित मदने, पोकों सोमनाय मोहिते, पोकॉ रमेश बोराटे, पोकों रमेश कर्चे, मपोकों नेहा बोंदर, मपोकों वैशाली शेंडे यांचे आभार मानले.

सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हददीतील नागरीकांकडुन नातेपुते पोलीस ठाणेच कौतुक करण्यात येत असुन नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button