ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

गोरडवाडी गावात सुसंस्कृत, विनयशील, नम्रता, सर्वगुण संपन्न असणाऱा राजकारणातील उगवता तारा…

गोरडवाडी (बारामती झटका)

गोरडवाडी, ता. माळशिरस, येथील गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संतोष अज्ञान गोरड उर्फ सनू चेअरमन यांना वाढदिवसाच्या बारामती झटका परिवार यांचे कडून खूप शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस व गोरडवाडी गावचे ग्रामदैवत श्री बिरोबा देवाला साकडं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो याच वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छा आहेत.

गोरडवाडी गावात अज्ञान गोरड सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचा माळशिरस येथील बापूराव काळे यांची लेक सिंधुताई यांच्याशी विवाह झालेला आहे. सिंधुताई व अज्ञान गोरड यांना धुळदेव, नवनाथ, प्रशांत व संतोष अशी चार मुले व ललिता लक्ष्मण हुलगे अशी एक मुलगी आहे. सिंधुताई व अज्ञान गोरड यांनी आपल्या पाचही मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. मुलांनी सुद्धा आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन शेती, उद्योग व राजकारण यामध्ये नाव कमविलेली आहे.

संतोष गोरड यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. आर्थिक व्यवहारापुरते शिक्षण केलेले आहे. संतोष यांचा माळशिरस येथील तुकाराम वाघमोडे यांची लेक शोभा त्यांच्याशी विवाह झालेला आहे. शोभा आणि संतोष यांना सुनील व दाजी दोन जुळी मुले झालेली आहेत. माळशिरस येथील वाघमोडे परिवारातील शोभा यांनी गोरड परिवारामध्ये आपल्या घराण्याचे नाव उज्वल करून उत्कृष्ट प्रकारे संसार करण्याचे काम सुरू आहे.

संतोष गोरड उत्कृष्ट प्रकारे शेती व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या शेतामध्ये डाळिंब, ऊस, कांदा अशी पिके घेतली जातात. त्यामधून आपल्या संसाराची प्रगती सुरू आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी समाजकारणाला सुरूवात केली. आणि त्यांना गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर चेअरमन पदाची संधी मिळाली. चेअरमन पदाच्या कारकिर्दीमध्ये सभासद व शेतकरी यांचे हित जोपासण्याचे काम त्यांनी केलेले आहे.

आई-वडिलांनी दिलेला सुसंस्कृतपणा, वागण्यामध्ये विनयशीलता, बोलण्यामध्ये नम्रता अशा सर्वगुण संपन्न असणाऱ्या युवकाकडे राजकारणातील उगवता तारा म्हणून पाहिले जात आहे. बिरोबा देवाची यात्रा असो किंवा कोणाचे लग्नकार्य, जागरण किंवा इतर कार्यामध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. संतोष समाजामध्ये वागत असताना वरिष्ठांचा आदर व लहानांचा सन्मान करतात.

लहान वयामध्ये सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर गाव गाड्यातील ग्रामपंचायत सदस्य होण्याकरता गावातील नेतेमंडळी व मित्रपरिवार संतोष गोरड यांच्याकडे जबाबदारी देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. निश्चितपणे ग्रामपंचायतीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतील, असा मित्रपरिवार यांना विश्वास आहे. निश्चितपणे भविष्यातील गोरडवाडी गावचा उगवता तारा संतोष गोरड उर्फ सनू
चेअरमन यांच्या मनातील अपेक्षा इच्छा पूर्ण होऊन गावातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा निश्चितपणे करतील, असा विश्वास गावातील नेते मंडळी व मित्रपरिवार यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त बारामती झटका परिवार यांचे कडून खूप खूप शुभेच्छा….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom