ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज यांचे मळोली येथे सुश्राव्य कीर्तन होणार.

स्वर्गीय सौ. निलावती निवृत्ती जाधव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…

मळोली (बारामती झटका)

देहू संस्थानचे माजी अध्यक्ष व श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज यांचे गुरुवार दि. 29/5/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये स्वर्गीय सौ. निलावती निवृत्ती जाधव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी वेळेवर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे श्री. निवृत्ती रामहरी जाधव पाटील, पांडुरंग उर्फ आप्पासो निवृत्ती जाधव पाटील, विठ्ठल निवृत्ती जाधव पाटील व समस्त जाधव पाटील परिवार मळोली त्यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

निलावती व निवृत्ती जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला होता. शेती, गुरे-ढोरे अफाट कष्टातून संसार फुलवून आपल्या मुला-मुलींना चांगले संस्कार दिलेले आहेत. सांप्रदायिक घराणं असून आजही त्यांच्या तिसऱ्या पिढीच्या गळ्यामध्ये पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ आहे.

स्वर्गीय सौ. निलावती यांना अक्का या नावाने ओळखत असत. आक्कांचा मनमिळावू व सुसंस्कृत स्वभाव होता. जाधव कुटुंबीय दुग्ध व्यवसाय व उत्कृष्ट शेतीसाठी शेतामध्येच वास्तव्यास आहेत. वस्तीवर कोणत्याही कामानिमित्त नातेवाईक मित्रपरिवार व गावातील कोणताही व्यक्ती आला तर त्याचे आदरातिथ्य अक्का करीत असत. त्यामुळेच त्यांना सौभाग्य मरण आलेले आहे. पांडुरंग उर्फ आप्पासाहेब व विठ्ठल या दोन राम लक्ष्मणासारख्या भावांनी संसारामध्ये व समाजात आपले चांगले स्थान निर्माण केलेले आहे. त्यांच्या पश्चात मुले, सुना, लेकी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पांडुरंग उर्फ आप्पासाहेब यांनी मळोली गावच्या पोलीस पाटील पदाची धुरा सांभाळलेली आहे. सध्या मळोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. अध्यात्म, समाजसेवा, राजकारण, उद्योग व्यवसाय, शेती, दुग्ध व्यवसाय असे असणारे जाधव कुटुंबीय त्यांच्या परिवारामध्ये गेल्यावर्षी निलावती उर्फ अक्का यांचे दुःखद निधन झालेले होते.

मनुष्य जन्मामध्ये देवाधिकांनाही मृत्यू चुकलेला नाही, असे समजून जाधव कुटुंबीय यांनी आक्कांच्या आठवणीने वर्ष घालविलेले आहे. अक्कांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मित्र परिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे मळोली गावचे माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासाहेब निवृत्ती जाधव पाटील व समस्त जाधव पाटील परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button