ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर

सोलापूर (बारामती झटका)
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा शनिवार, दि. ३१ मे २०२५ रोजीचा सातारा, सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झाला आहे.
शनिवार, दि. ३१.०५.२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा. ‘कमलकुंज’, निवासस्थान, बोराटवाडी, ता. माण येथून मोटारीने पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण, १०.३० वा. पंढरपूर येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समारंभास उपस्थिती (स्थळ – अहिल्यादेवी होळकर चौक, पंढरपूर, जि. सोलापूर) (संदर्भ – श्री. माऊली हळवणकर), १०.४५ वा. पंढरपूर येथून सोलापूरकडे प्रयाण, दु. १२.०० वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव समारंभास उपस्थिती (स्थळ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर (संदर्भ – श्री. प्रकाश महानवर, कुलगुरू), ०१.४५ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ येथून हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूरकडे प्रयाण, ०२.०० वा. हरिभाई देवकरण प्रशाला येथे आगमन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोलापूर शहर आयोजित, संघ शिक्षा वर्ग समारोप समारंभास उपस्थिती (स्थळ – हरिभाई देवकरण प्रशाला, होम मैदान समोर, सोलापूर) (संदर्भ – श्री. विश्वास कुलकर्णी), त्यानंतर सोलापूर येथून बोराटवाडी, ता. माण, जि. साताराकडे प्रयाण, ‘कमलकुंज’ निवासस्थान, बोराटवाडी येथे आगमन व राखीव असा असणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.