अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे सेवानिवृत्त होऊन “घरी” मात्र, नावाची पाटी कार्यालयाच्या तशीच “दारी”….

अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र तुकाराम काकडे दि. 31/05/2025 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. सध्या सचिव पदाचा पदभार उपसचिव माने देशमुख यांच्याकडे आहे. मात्र, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र तुकाराम काकडे सेवानिवृत्त होऊन घरी गेले मात्र, त्यांच्या नावाची पाटी कार्यालयाच्या दारावर तशीच लटकत राहिलेली आहे. दारावरील पाटी पाहून सेवानिवृत्त झाले आहेत की नाही, अशी शंका अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकरी, व्यापारी त्यांच्यामध्ये सुरू आहे.
सेवानिवृत्त म्हणजे सदरच्या कार्यालयाचा कार्यालयीन काहीही संबंध राहत नाही. मात्र अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे सेवानिवृत्त होऊन सुद्धा नावाची पाटी तशीच ठेवण्या पाठीमागे काय उद्देश आहे, याचा पणन संचालक पुणे, जिल्हा निबंधक सोलापूर व सहाय्यक निबंधक अकलूज यांनी उलघडा करावा. सदरची पाटी त्वरित हटविण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याच्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयीन अधीक्षक किंवा पदभार असणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अश्या मागणीने जोर धरलेला आहे.

आज सोमवार दि. 02/06/2025 रोजी अकलूज येथे आठवडा बाजार भरत असतो. अनेक व्यापारी, गाळेधारक, शेतकरी कामानिमित्त बाजार समितीच्या कार्यालयात आल्यानंतर श्री. राजेंद्र काकडे सचिव अशी समोर पाटी पाहून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.