अकलुज पोलीसांची लाख मोलाची कामगिरी, 26 लाखांचा गांजा पकडला तर, दोघे अटकेत..

अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे अकलुज पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून सुमारे 26 लाख रुपये किमतीचा 129 किलो गांजा पकडला. यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती स. पो. नी. विक्रम साळुंखे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, महाळुंग, ता. माळशिरस येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याची माहिती अकलूज पोलिसांना खबऱ्याकडून मिळताच स. पो. नी. विक्रम साळुंखे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राजू महादेव काळुंखे रा. उजनी केनोल जवळ, महाळुंग याच्या घरी धाड टाकली असता तेथे आठ गोण्यामध्ये सुमारे 129 किलो 426 ग्रॅम वजन असलेला गांजा मिळून आला. याची किमत सुमारे 25 लाख 68 हजार 340 रुपये इतकी आहे. यावेळी आरोपी राजू महादेव काळुंखे व आनंद भगवान भिसे रा. अकलूज यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, स.पो.नि. योगेश लंगुटे, स.पो.नि. गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वणवे, पोलीस हवालदार सुहास क्षिरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, किशोर गायकवाड, अजय बुरले, सोमनाथ माने, मोहन मस्के, रणजित जगताप, प्रविण हिंगणगावकर, चालक महादेव जाधव, शरद आगलावे यांनी कामगिरी केली आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे हे करीत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.