सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा महात्मा फुले विचाररत्न पुस्काराने नागपुरात गौरव

नागपूर (बारामती झटका)
संत कबीर जयंती निमीत्ताने श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूर यांच्यावतीने दि.12 जून 25 रोजी रात्री 8 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या पुणे येथील सत्यशोधक रघुनाथदादा ढोक यांचा सन्मानचिन्ह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रंथ व पुष्पगुच्छ आचार्य हरीभाऊ वेरुळकर यांचे शुभहस्ते देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. महात्मा फुलेंच्या वेषात रघुनाथ ढोक सत्यशोधक पद्धतीने लग्न व वास्तुसोहळे पार पाडीत इतरही सामाजिक क्षेत्रात गेली 34 वर्ष काम करीत आहेत. त्यांनी गेल्या 5 वर्षात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात एकूण 53 जातीय, आंतरजातीय, विधवा, विधुर, घटस्पोटीत, विकलांग विना मोबदला विवाह लावले आहेत. त्यातील 7 विवाह स्वतःच्याच घरात लावले आहेत. तसेच मोफत 14 वास्तू सोहळे देखील पार पाडले आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आचार्य हरिभाऊ वेरुळकर, होते. ते म्हणाले की, रघुनाथ ढोक यांचा सत्कार म्हणजे मानवतावादी विचारांचा सत्कार असे मत मांडले. सत्कारमुर्ती रघुनाथ ढोक यांनी माझा सत्कार नसुन फुलेंच्या विचारांचा गौरव आहे. सत्कारामुळे फुलेंच्या विचाराप्रती माझी जबाबदारी वाढली, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक यावले यांनी संत कबीरांचा फुलेंच्या विचारांमुळे सामाजिक बंध आणखी घट्ट होतात, असा विचार दिला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेंद्र बुराडे यांनी तर, सूत्रसंचालन राजेश कुंभलकर यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर रक्षक, सावित्रीबाई फुलेंचे वारस डॉ. दिलीप नेवासे, सातारा, माजी न्यायाधीश शिवदास महाजन, पुणे, माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे उपस्थित होत्या. यावेळी दिलीप सुरकार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विठ्ठलराव पुनसे, संगीता जावळे, प्रभा ठवकर, प्रा. रामदास टेकाडे, रुपराव वाघ, मुरलीधर नरड, सियाराम चावके, आनंद माथने बहुसंख्य पुरोगामी विचारवंत उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.