ताज्या बातम्यासामाजिक

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची नातेपुते येथे 300 वी जयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडली…

डीजे ऐवजी पारंपारिक बँड वाद्यासह गजीढोल व ढाल, तलवार, लाट्या-काट्या मर्दानी खेळामध्ये नेत्र दीपक रोषणाई, सजावटीमध्ये मिरवणूक संपन्न झाली….

नातेपुते (बारामती झटका)

अखंड भारताचे गौरव असणाऱ्या आणि धनगर समाजाचा स्वाभिमान सर्व जाती-धर्माचा अभिमान असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरणात पारंपारिक पद्धतीने साजरी झालेली आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त नातेपुते पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव यांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी राजेंद्र पांढरे, उपाध्यक्षपदी सनी गवळी, कार्याध्यक्ष अभिजीत चांगण, खजिनदार अजित पांढरे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दि. 31/05/2025 रोजी पुणे पंढरपूर रोडवरील एसटी स्टँड शेजारी असलेल्या पुतळ्याचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रघुनाथ कवितके, नगराध्यक्षा सौ. अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, मामासाहेब पांढरे, ॲड. बी. वाय. राऊत, माऊली पाटील, एन. के. साळवे, मालोजीराजे देशमुख, नगरसेवक अण्णासाहेब पांढरे, शिवाजीराव पिसाळ, अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र (बाॅस) पांढरे, मोहीतशेठ जाधव, महेश शेटे, नितीन भांड, संदीप ठोंबरे, भैय्यासाहेब चांगण, नंदकुमार लांडगे, माऊली सरक, बाबाराजे बोडरे, अक्षय भांड, अभिजीत चांगण, अक्षय ठोंबरे, सूचित साळवे, अर्जुन पिसाळ, अंकुश कचरे, माऊली उराडे, हनुमंतराव घालपे, प्रेमभैया देवकाते, सुरेश पांढरे, संजय उराडे, अमित चांगण, नागेश मेटकरी, सुनील गवळी
उपस्थित होते.

गुरुवार दि. 12/06/2025 रोजी सकाळी 09.30 वाजता युवा कीर्तनकार व्याख्याते ह. भ. प. रवीकुमार वसंतराव ठवरे पाटील यांचे आहिल्यादेवी होळकर प्रांगणामध्ये व्याख्यान झाले. यावेळी विधानपरिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी सहा वाजता सर्व समाज बांधव एकत्र येऊन डीजे ऐवजी पारंपारिक बँड वाद्यासह गजी ढोल व लहान मुलांमुलींनी ढाल, तलवार, लाट्याकाट्या, मर्दानी खेळामध्ये नेत्रदीपक रोषणाई सजावटीमध्ये मिरवणूक संपन्न झाली. लाइटिंगचा रथ तयार केलेला होता. अहिल्यादेवींच्या वेशामध्ये लहान मुली आकर्षक साड्या परिधान करून घोड्यावर बसलेल्या होत्या. जय तुळजाभवानी देवीला श्रीफळ वाढवून भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात झालेली होती. या वेळेला शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, शरदबापू मोरे, मामासाहेब पांढरे, रावसाहेब पांढरे माऊली पाटील, रणजीत काळे, अधिक उराडे, अमित चांगण, सागर बिचुकले, प्रेमभैया देवकाते, पप्पू दुधाळ, राजेंद्र सोनवळ, अमरजीत जानकर, रणजीत पांढरे, भानुदास उराडे, किरण टकले यांच्यासह अनेक मान्यवरांनी मिरवणुकीच्या रथास अभिवादन केले.

पुणे-पंढरपूर रोडवर भव्य दिव्य मिरवणूक मार्गस्थ झालेली होती. आकर्षक रथ, विद्युत रोषणाई, फटाके, मनमोहक बँडच्या आवाजात गजी ढोल खेळत मिरवणूक जात असताना पुणे-पंढरपूर रोड वरून प्रवास करणाऱ्या जाणा-येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत होती. जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष राजेंद्र पांढरे, उपाध्यक्ष शनी गवळी, कार्याध्यक्ष अभिजीत चांगण, खजिनदार अजित पांढरे व सर्व समाज बांधव यांनी आदर्शवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button