माळशिरस तालुक्याच्या पूर्व उत्तर भागातील मोहिते पाटील गटात राजकीय भूकंप होणार…

मोहिते पाटील यांच्या पूर्व दक्षिण भागातील मोहिते पाटील यांच्या राजकारणाला स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख गटाने सुरुंग लावला आहे…
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या राजकारणाला कायम माळशिरस तालुक्यातील पूर्व भागाने साथ दिलेली आहे. मोहिते पाटील घराण्याकडून राजकीय सूडबुद्धीचे राजकारण विशेष करून तिसऱ्या पिढीकडून होत असल्याने माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागातील मोहिते पाटील यांच्या तीन पिढ्यांना सहकार्य करणाऱ्या माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख गटाने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन व भविष्यातील या भागांचा विकास करण्याच्या दृष्टीने पूर्व दक्षिण भागात हजारो नेते व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेऊन राजकीय सुरुंग लावलेला आहे. याचाच परिणाम माळशिरस तालुक्याच्या पूर्व उत्तर भागातील मोहिते पाटील गटात झालेला असून लवकरच राजकीय भूकंप होणार अशी उघड उघड चर्चा सुरू झालेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा आणून दमदार विकास केलेला आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 70 वर्षांमध्ये विकासकामांचा बॅकलॉग भरून काढलेला असल्याने तीन पिढ्यांचे राजकारण करणारे शिवरत्न मोहिते पाटील व तीस वर्ष राजकारण करणारे उत्तमराव जानकर गट एकत्र येऊन सुद्धा विधानसभेला माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये 17 व्या फेरीपर्यंत आमदार राम सातपुते यांची आघाडी होती. मात्र, माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मतदान कमी पडून राम सातपुते यांचा निसटता पराभव जरी झाला असला तरी एक लाख आठ हजार असे लक्षणीय मतदान घेऊन महाराष्ट्राचे लक्ष राम सातपुते यांनी वेधून घेतलेले होते.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात गिरझणी, आनंदनगर, बागेचीवाडी, कोंडबावी, विजयवाडी, विझोरी, माळीनगर, अकलूज, माळेवाडी या गावांमधून राम सातपुते यांनी चांगले मतदान घेऊन त्यांना अनेक गावांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त मतदान आहे. तत्कालीन आमदार राम सातपुते यांना गेल्या पाच वर्षांमध्ये पूर्व भागात लक्ष देता आलेले नाही त्यामुळे फारसा जनसंपर्क न वाढल्याने मतदान घटलेले होते. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान नेते व कार्यकर्त्यांचा माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात भाजपच्या विचाराची वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची फळी उभा करण्याचे काम सुरू आहे.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व उत्तर भागात लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख गटाने बंडाचा दरवाजा उघडण्याचे काम केलेले आहे. पूर्व दक्षिण भागामध्ये वेळापूर, पिसेवाडी, खंडाळी, तोंडले, बोंडले, दसुर, खळवे, उघडेवाडी, शेंडेचिंच, धानोरे, मळोली, निमगाव, साळमुखवाडी, तांदुळवाडी, कोळेगाव, फळवणी, काळमवाडी या भागातील मोहिते पाटील गटांचे नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या बैठका व बोलाचाली लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या समवेत सुरू आहेत.
माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागातील मोहिते पाटील यांच्या राजकारणाला स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख गटाने सुरुंग लावल्यानंतर माळशिरस तालुक्याच्या पूर्व उत्तर भागातील मोहिते पाटील गटाच्या राजकीय बालेकिल्ल्यात भूकंप होणार आहे.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व उत्तर भागातील माळीनगर, सवतगव्हाण, बिजवडी, तांबवे, संगम, बाभुळगाव,या भागातील नेते व कार्यकर्ते मोहिते पाटील गटाचे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहे.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या 70 वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याची व पिढ्यानपिढ्या ऐकून असणारी निरा देवधर पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात जाणीवपूर्वक विकासापासून कोसो दूर ठेवलेल्या जनतेच्या अडीअडचणी व विकास कामे करून लोकप्रतिनिधी यांनी खऱ्या अर्थाने मोहिते पाटील विरोधी मतदानामध्ये वाढ केलेली आहे. पूर्व भागामध्ये अशाच पद्धतीने वाटचाल सुरू असून भविष्यात पूर्व व पश्चिम असा भाग न राहता माळशिरस तालुक्यात कमळाचा मळा फुलणार आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा माळशिरस तालुक्यातील राजकारणाला चांगलाच फायदा होणार आहे. नामदार जयकुमार गोरे यांच्यामुळे माळशिरस तालुक्यातील माळी समाज मोहिते पाटील गटाला सोडचिट्टी देऊन राम सातपुते यांच्या समवेत उघड उघड दिसत आहेत. माळशिरस तालुक्यातील माळी समाज शांत व संयमी आहे मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे माळी समाज यांची राजकीय ताकद व मानसिकता बळावलेली आहे.
माळी समाजाचे नेते व कार्यकर्ते बोलताना आम्ही राजकारणात फार सहन केलेले आहे. आत्ता आम्हाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे आत्मविश्वास व ताकद वाढलेली आहे. माळी समाज भारतीय जनता पक्षासमवेत 90% टक्के जोडला गेलेला आहे.
माळशिरस तालुक्याची राजकीय परिस्थिती पूर्वीपासून मोहिते पाटील पारंपारिक असणारं तालुक्याच्या पश्चिम भागातील विरोधक मतदान यामध्ये मोहिते पाटील व जानकर दोन गट एकत्र येऊन सुद्धा वाढ झालेली आहे. पूर्व भागात लवकरच पश्चिम भागासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे.

मोहिते पाटील परिवारातील राजकारणातील तिसरी पिढी खाजगीत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करताना बोलतात, नेते व कार्यकर्ते कितीही जाऊ द्या आम्हीबी टीम तयार करू, असे कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करतात मात्र, आत्ताची राजकीय परिस्थिती पूर्वीसारखी नाही यांना कोण सांगणार, अशी कार्यकर्त्यांमध्येच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मोहिते पाटील यांच्या राजकारणाची अशी अवस्था झाली भुईमुगाच्या शेंगा मधील शेंगदाणे बाहेर काढल्यानंतर उरतात ते फक्त टरफले. शेंगदाण्यासारखे नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये उघड उघड जात असल्याने भविष्यात मोहिते पाटील यांच्याकडे टरफले राहतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याचा प्रत्यय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे येणार असं फरक पहावयास मिळणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.