महायुती भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्ष व संघटना यांचा स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार..
फलटण (बारामती झटका)
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महायुतीच्या वतीने बांधकाम कामगार, लाडकी बहिण, वयोश्री, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनांच्या लाभार्थी कुटूंबाचा स्नेह मेळावा व स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. १९/६/२०२५ रोजी सायंकाळी ६ वा. नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान आ. सचिनजी पाटील हे असणार आहेत.
तसेच या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर व सौ. मनिषा नाईक निंबाळकर या असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, शिवसेनेचे फलटण तालुका अध्यक्ष नानासो (पिंटूशेठ) इवरे आदी मान्यवर असणार आहेत.
तरी या कार्यक्रमास कार्यकर्ते व लाभार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक माजी नगरसेवक सुदामराव मांढरे, माजी नगरसेवक अनुप शहा, माजी नगरसेवक फिरोज आतार, माजी नगरसेवक अजय माळवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.