ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

विमान दुर्घटनेतील वारसांना एक कोटी रुपये दिले त्याचेच अनुकरण सयाजीराजे वॉटर पार्क प्रशासनाने करावे….

तुषार धुमाळ भिगवन यांचा सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्याचा एक पाळणा निसटून दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडले…

अकलूज (बारामती झटका)

अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, येथील सयाजीराजे वॉटर पार्क पर्यटन स्थळ आणि वॉटर पार्क आहे. जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातून या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक येतात‌ मोहिते पाटील यांच्या मालकीचे हे वॉटरपार्क आहे.

आज बुधवार दि. 18/06/2025 रोजी दुपारी सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झालेले होते. त्यामधील तुषार धुमाळ भिगवन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. अपघातातील एकाच्या मानेला फ्रॅक्चर झालेले आहे तर, पाळण्यातील तिसरा व्यक्ती घाबरला असून तो किरकोळ जखमी आहे.

तुषार धुमाळ, भिगवन येथील आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व भावजय असा परिवार आहे. तुषार धुमाळ एलआयसी एजंट होते, घरातील कर्ता पुरुष होते. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. धुमाळ कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. विमान अपघातात एक कोटी रुपये वारसांना जाहीर केलेले होते. त्याचेच अनुकरण करत सयाजीराजे वॉटर पार्क प्रशासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करावे, अशी चर्चा सुरू आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून वॉटर पार्क प्रशासनाने भरपूर कमाई केलेली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झालेला आहे. एक कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. फिरत्या पाळण्यातील एकच पाळणा कसा निखळून पडतो, याची सखोल चौकशी करावी अशी मयत तुषार धुमाळ यांच्या नातेवाईकांमधून चर्चा सुरू आहे. सध्या तुषार धुमाळ यांना त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक घेऊन गेलेले आहेत. मयत धुमाळ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहेत. निसर्गरम्य ठिकाणी किंवा पार्कमध्ये साहसी खेळाचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि वॉटर पार्क आहे. जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातून याठिकाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक येतात. जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे हे वॉटर पार्क असून दुर्दैवाने आज येथील पाळण्याच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी, एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. तर, पाळण्यातील तिसरा व्यक्ती घाबरला असून तो किरकोळ जखमी आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button