टेंभुर्णी येथे मे. त्रिमुर्ती ट्रॅक्टर्सचा उद्घाटन समारंभ सोहळा होणार संपन्न

मा. आ. संजयमामा शिंदे, पी. डी. सी. सी. बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, युवा नेते विक्रमसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते होणार संपन्न
टेंभुर्णी (बारामती झटका)
टेंभुर्णी येथे मे. त्रिमुर्ती ट्रॅक्टर्स चा उद्घाटन समारंभ सोहळा सोमवार दि. २३/०६/२०२५ रोजी दुपारी १ वा. अकलूज चौक, कोटक बँके शेजारी, अकलूज रोड, टेंभुर्णी, ता. माढा, येथे संपन्न होणार आहे. या शोरूमचे उद्घाटन करमाळा विधानसभेचे माजी आमदार संजयमामा शिंदे, पी. डी. सी. सी. बँक पुणे चे संचालक आप्पासाहेब जगदाळे, युवा नेते विक्रमसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
त्यावेळी प्रमुख उपस्थितीत गजानन हुजरे (C. B. U. Manager MH), परेश प्रधान (Regional Manager MH), मंगेश डहाके (Dealer Development MH), गणेश निंबोरे (Cluster Head MH), प्रवीण देशपांडे (Parts Head MH), स्वप्निल राऊत (Territory Manager), प्रशांत बावणकर (Service Engineer), युवा उद्योजक रावसाहेब (नाना) देशमुख, जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर (बापू) महाडिक, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव येवले पाटील, शिवसेनेचे नेते संजय (बाबा) कोकाटे आदी मान्यवर असणार आहेत.

तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदीप (मामा) जगदाळे, पोपटराव चव्हाण आणि सचिन आरडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.