ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. ॲड. पांडुरंग महाराज दहीगावकर, नातेपुते यांचे खुडूस येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. दादासाहेब झंजे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन

खुडूस (बारामती झटका)

खुडूस येथे कै. दादासाहेब धुळा झंजे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन गुरुवार दि. २६/६/२०२५ रोजी खुडूस, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी पुण्यस्मरणानिमीत्त ह. भ. प. ॲड. पांडुरंग महाराज दहीगावकर, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. केशर व श्री. धुळा शंकर झंजे, ॲड. सौ. विजया व ॲड. श्री. सिताराम धुळा झंजे, श्रीमती रोहिणी दादासाहेब झंजे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त झंजे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button