समाज प्रबोधनकार ह. भ. प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांचे गोरडवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. आबाजी कर्णवर पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी, ता. माळशिरस येथे कै. आबाजी यशवंत कर्णवर पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचे आयोजन गुरुवार दि. २६/६/२०२५ रोजी कर्णवर पाटील वस्ती, गोरडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण निमित्त समाज प्रबोधनकार ह. भ. प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त कर्णवर पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.