वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखी मार्गावर १03 गळती जलरोधक मंडप उभारण्याचे काम सुरू

सोलापूर (बारामती झटका)
वारी काळात पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पालखी मार्गावर विविध ठिकाणी १०३ जलरोधक मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. यात ९४ पाणी गळती प्रतिबंधात्मक जलावरोधक मंडप तर ९ जर्मन हँगरसह मंडपचा समावेश आहे.
पालखी मार्गावर मंडप उभारणे, योजना बाह्य रस्ते, पालखीतळ सुधारणे, ८२ मुक्काम, विसावा ठिकाणी पालखी मार्गावरील अतिक्रमण काढणे, ५५ मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी स्वागत कमानी उभारणे, ३० रस्ते व पूल दुरुस्तीची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सोपवली आहे. यापूर्वीच ४१ योजना बाह्य रस्ते व पालखीतळ सुधारणे ही कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील ३० योजना रस्ते व पूल दुरुस्तीचे काम हे पूर्ण करण्यात आले आहेत.
वारी काळातील बांधकाम विभागाची जबाबदारी
९४ पाणी गळती प्रतिबंधक जलावरोधक मंडप उभा करणे, पालखी विसावाच्या ठिकाणी व मुक्कामाच्या ठिकाणी ९ जर्मन हँगरसह मंडप उभारणे, ४१ योजना बाह्य रस्ते व पालखीतळ सुधारणा करणे, ८२ पालखी मुक्काम, विसावा पालखी तळ व मार्गावरील अतिक्रमण काढणे, ५५ मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी स्वागत कमानी उभा करणे, 30 – योजना रस्ते व पूल दुरुस्ती करणे.
मंडप उभारणीचे काम प्रगतिपथावर – कोहिणकर
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने पालखी मार्गावर १०३ जलावरोधक मंडप उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. सुरू असणाऱ्या कामावर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे यासह बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. वारी काळात पावसापासून वारकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी जलावरोधक मंडप उभारण्यात येत आहेत, अशी माहिती या संदर्भात बोलताना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.