राजेंद्र उर्फ दादासाहेब उराडे यांचा आनंद विरोधकांना आळवा वरचं पाणी ठरला, दादासाहेब स्वगृही परत….

दादासाहेब यांच्या समवेत जयंतीत सहभागी झालेले स्वप्नातच गेले, सकाळी उठून पाहिले तर वेगळेच झाले….
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये नातेपुते नगरीचे विद्यमान नगरसेवक व स्वाभिमानी नेतृत्व राजेंद्र उर्फ दादासाहेब उराडे जयंतीमध्ये सहभागी झालेले होते. त्या वेळेला त्यांच्या समवेत वेगळ्या विचाराचे लोक सहभागी झालेले होते. त्यामुळे वेगळ्याच दुनियेमध्ये असल्यासारखे वाटत असतानाच स्वप्नात असल्यासारखेच झाले. सकाळी उठून पाहिले तर वेगळेच पहायला मिळाले. स्वाभिमानी नेतृत्व राजेंद्र उर्फ दादासाहेब उराडे यांचा आनंद विरोधकांना आळवा वरचं पाणी ठरलेलं आहे, कधी वरंगळून जाईल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, नातेपुते नगरपंचायतीचे ज्येष्ठ नेते नगरसेवक ॲड. भानुदास राऊत, नगरसेवक ॲड. रावसाहेब पांढरे, नगरसेवक दीपक काळे, नगरसेवक माऊली उराडे, नगरसेवक अमित चांगण, ज्येष्ठ नेते प्रवीण काळे, युवा नेते सतीश बरडकर आदींची सकारात्मक बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर भारतीय जनता पार्टीचे नातेपुते शहराध्यक्ष तथा नातेपुते नगरीचे उद्योजक राजेंद्र पांढरे उर्फ बॉस यांचा सन्मान दादासाहेबांनी केला. दोन राजेंद्र नातेपुते नगरीच्या स्वाभिमानाच्या लढाईसाठी पुन्हा एकत्र दिसल्याने जयंतीमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी स्वप्नातच दादासाहेबांच्या समवेत जयंती साजरी केली की काय, असा प्रश्न पडलेला असावा अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

राजेंद्र उर्फ दादासाहेब उराडे स्वाभिमानी नेतृत्व व यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचे राजकारण व व्यवसाय कोणावरही अवलंबून नाही. मात्र, पहिल्यापासून प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका कायम ठेवलेली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्यासोबत कायम राहून राजकारणामध्ये सक्रिय सहभागी होते. दादासाहेब स्वाभिमानी असल्याने त्यांना जर जनतेच्या हिताची असणारी गोष्ट झाली नाही, मनाविरुद्ध झालं तर मात्र त्यांचा स्वाभिमान जागा होतो आणि तशाच पद्धतीने काही गोष्टींमुळे सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जात नसेल तर त्यांनी मनात नसताना सुद्धा पारंपारिक विरोधी लोकांमध्ये सहभागी होऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती साजरी केलेली होती. जयंतीमध्ये अनेकजण वाद्याच्या आवाजामध्ये तल्लीन होऊन नाचत होते. जयंतीचा आनंद व जल्लोष असतानाच दादासाहेब यांच्या समवेत जयंतीत असल्याने अनेकांचे देहभान हरपलेले होते. अशी जयंती साजरी झालेले फोटो व व्हिडिओ प्रस्थापितांनी व्हायरल केलेले होते.
तालुक्याच्या कानाकोपऱ्यात बातमी पसरलेली होती परंतु, हा आनंद काही क्षणाचाच राहिला. नातेपुते नगरीचे कर्तव्यदक्ष व निष्ठावान भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र पांढरे उर्फ बॉस यांनी उद्योजक राजेंद्र उर्फ दादासाहेब यांच्याशी सल्ला मसलत केली. शंका कुशंकेवर पडसाद पाडले आणि पुन्हा दादासाहेब स्वगृही आलेले असल्याने विरोधकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ग्रामीण भागात म्हण आहे, आनंद अळवावरचं पाणी ठरले आहे, याची खुमासदार चर्चा नातेपुते पंचक्रोशीमध्ये सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.