ताज्या बातम्यासामाजिक

आषाढी वारीतील माऊलींच्या भाविकांसाठी साई सेवा दल नातेपुते यांचा स्तुत्य उपक्रम…

नातेपुते (बारामती झटका)

आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य साधुसंतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मजल दरमजल करीत पायीवारी येत आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविक सहभागी असतात. अशावेळी भाविकांना मोबाईल चार्जिंग करण्याचा प्रॉब्लेम असतो. भाविकांची खरी गरज ओळखून नातेपुते येथील साई सेवा दल यांच्या वतीने मोफत चार्जिंग सुविधा उपलब्ध केलेली आहे. यासाठी मिनार मोबाईल शॉपी नातेपुते यांचे मोफत लाईट देऊन विशेष सहकार्य असते.

नातेपुते पंचक्रोशीमध्ये साई सेवा दल जनहितार्थ विविध उपक्रम राबवीत असतात, जेणेकरून सर्वसामान्य व गरजू लोकांना राबविलेल्या उपक्रमाचा फायदा झाला पाहिजे. हा लोकहिताचा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून साई सेवा दल काम करीत असते. आषाढी वारीमध्ये लाखो भाविक महाराष्ट्रासह देशाच्या बाहेरूनही लोक माऊलींच्या व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. सध्या एकविसाव्या शतकाकडे वाटचाल असताना डिजिटल युग झालेले आहे. अशावेळी आपण कोठेही असलो तरी आपला घरी संबंधित व्यक्तीशी संपर्क कायम ठेवण्यासाठी आपल्याला मोबाईल उपकरण उपलब्ध आहे. मोबाईल चार्जिंग हा महत्त्वाचा भाग आहे चार्जिंग नसेल तर रेंज किंवा मोबाईल मध्ये डाटा असून सुद्धा काही फायदा नाही. यासाठी चार्जिंग लागते आणि हीच चार्जिंगची खरी गरज ओळखून साई सेवा दल नातेपुते यांनी स्तुत्य उपक्रम दहिगाव चौकामध्ये पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर सुरू केलेला आहे.

अनेक भाविक मोबाईल चार्जिंग करण्याकरता येत आहेत. अनेक ठिकाणी मोबाईल चार्जिंग करण्याकरता शुल्क आकारले जाते मात्र, साई सेवा दल यांनी मोफत चार्जिंगची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध केलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button