मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विसर पडला….

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला 113 कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य केल्याने हंगाम पूर्ण झाला….
सदाशिवनगर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा विधान परिषदेचे भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विसर पडला आहे. आषाढी वारी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांचे स्वागत डिजिटल फलक श्री शंकर सहकारी साखर कारखाना प्रशासनाने लावलेला आहे. सदरच्या डिजिटल फलकावर साखर कारखान्याला 113 कोटी रुपयाचे शासनाच्या माध्यमातून खास बाब म्हणून सहकार्य करणाऱ्या मुख्यमंत्री यांचा फोटो डिजिटल फलकावर हवा होता, अशा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा बॅनरवर फोटो लावल्याने त्यांना काही फरक पडत नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो बॅनरवर न लावल्याने भविष्यात कारखान्याला फरक जाणवेल, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.