दसुर येथे श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

परिसरातील भाविकभक्तांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे श्रीमती कांचन डोळस यांचे आवाहन
दसुर (बारामती झटका)
स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चॅरिटेबल ट्रस्ट व स्वर्गीय आमदार हनुमंत जगन्नाथ डोळस संस्थापित श्री स्वामी समर्थ मठाचा सहावा वर्धापन दिन दसुर, ता. माळशिरस येथे शनिवार दि. १९/०७/२०२५ रोजी संपन्न होत आहे. या मठाचे संकल्पक माजी आमदार तथा स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय हनुमंतराव डोळस हे आहेत.
शनिवार दि. १९/०७/२०२५ रोजी सकाळी ६ ते ८ श्रींना अभिषेक व पूजा, सकाळी ११.३० वा. महाआरती, दु. १२ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ५ वा. श्रींची पालखीतून गाव प्रदक्षिणा व मिरवणूक, गाव प्रदक्षिणा करून पालखी परत मठात आल्यानंतर आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती कांचन हनुमंत डोळस यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



