माळशिरस पंचायत समिती सभागृहात सैनिकांसाठी राख्या पाठवण्याचा कार्यक्रम होणार

माळशिरस (बारामती झटका)
‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत सैनिकांसाठी राख्या पाठवण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. २२/७/२०२५ रोजी सायंकाळी ४ वा. ३० मि. पंचायत समिती सभागृह हॉल, माळशिरस येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी श्रीमती विजया पांगारकर उपस्थित राहणार आहेत. तसेच तालुक्यातील आजी-माजी सैनिक, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या शुभहस्ते सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तर तहसीलदार सुरेश शेजुळ, अकलूज पोलीस स्टेशनचे डीवायएसपी नारायण शिरगावकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी भगवान गावडे, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे, माळशिरस नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सुमित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक तानाजी एकनाथ वाघमोडे (पत्रकार), सौ. शोभा तानाजी वाघमोडे (पत्रकार) व समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



