झी टॉकीज फेम ह. भ. प. सौ. लिनाताई खाडे यांचे निमगाव मगराचे येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

निमगाव सोसायटीचे चेअरमन वसंतराव पाटील यांच्या धर्मपत्नी, प्रगतशील बागायतदार आनंदराव पाटील व ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. सुंदराबाई वसंतराव पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…
निमगाव (बारामती झटका)
झी टॉकीज फेम ह. भ. प. सौ. लीनाताई खाडे यांचे गुरुवार दि. 24/07/2025 रोजी सकाळी 09 ते 12 या वेळेत श्रवणीय कीर्तन सोहळा निमगाव गावच्या सुसंस्कृत व आदर्श गृहिणी स्वर्गीय सौ. सुंदराबाई वसंतराव पाटील उर्फ जीजी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे निमगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. वसंतराव तुळशीराम पाटील, प्रगतशील बागायतदार आनंदराव वसंतराव पाटील, निमगाव ग्रामपंचायत सदस्य युवा नेते किरण वसंतराव पाटील, समस्त पाटील व काटकर परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



