पालवे पाटील व रुपनवर पाटील आणि पालवे पाटील व वीरकर यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
श्री. बापूराव बबनराव पालवे पाटील.
पै. श्री. प्रज्योत उत्तमराव पालवे पाटील.
मु. पो. 51 फाटा मांडवे ता. माळशिरस
मांडवे (बारामती झटका)
श्री. बाबासो पांडा पालवे पाटील यांचे पणतू श्री. बबनराव बाबासो पालवे पाटील यांचे नातू व श्री. बापूराव बबनराव पालवे पाटील रा. मांडवे, ता माळशिरस यांचे जेष्ठ सुपुत्र चिरंजीव विजय व श्री. दाजी सिताराम रुपनवर पाटील यांची नात व श्री. हनुमंत दाजी रुपनवर पाटील रा. लोणंद, ता. माळशिरस यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. कां. निकिता आणि श्री. बाबासो पांडा पालवे पाटील यांचे पणतू व श्री. बबनराव बाबासो पालवे पाटील यांचे नातू व श्री. बापूराव बबनराव पालवे पाटील रा. मांडवे, ता. माळशिरस यांचे द्वितीय सुपुत्र चि. शंकर उर्फ कोंडीबा व स्वर्गीय शंकर नामदेव विरकर यांची नात व श्री. ज्योतीराम शंकर विरकर रा. वटफळी, ता. माळशिरस यांची द्वितीय सुकन्या चि. सौ. कां. पुनम उर्फ हर्षदा यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 27/07/2025 रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटे या शुभमुहूर्तावर मधुर मिलन मंगल कार्यालय, पुणे-पंढरपूर रोड, मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक श्री. बापूराव बबनराव पालवे पाटील व पै. श्री. प्रज्योत उत्तमराव पालवे पाटील, मु. पो. 51 फाटा मांडवे, ता. माळशिरस यांनी आवाहन केलेले आहे.

अग्नी नारायणाच्या साक्षीने रेशमाच्या बंधनात वाद्यांच्या गजरात, सनईच्या मधुर सुरात, विवाह संपन्न होत आहे. अशा पवित्र मंगल क्षणी शुभ आशीर्वादाची उधळण करण्याकरता सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आपले स्नेहांकित सौ. मिताबाई व श्री. बाबासो पांडा पालवे पाटील, सौ. सुलाबाई व श्री. बबनराव बाबासो पालवे पाटील, सौ. कांताबाई व श्री. उत्तमराव बाबासो पालवे पाटील, सौ. बाळुबाई व श्री. शिवाजी बाबासो पालवे पाटील, सौ. सविता व श्री. दादासो बाबासो पालवे पाटील, सौ. बायडाबाई व श्री. बाळासो बाबासो पालवे पाटील व समस्त पालवे पाटील परिवार, मांडवे यांच्या वतीने शुभकार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बदलत्या काळानुसार तसेच वेळेच्या अभावानुसार व्हॉट्सॲपद्वारें आणि फोन कॉलद्वारें सर्वांना लग्न पत्रिका पाठवत आहोत, तरी आपण सदर निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करावा आणि लग्नाला सहकुटुंब सहपरिवार यावे….

प्रत्यक्षात भेटून जरी आमंत्रण देणे शक्य झाले नाही, तरीही आमंत्रणाचा आग्रह तेवढाच आहे, जेवढी तुमच्या आगमनाची उत्सुकता…!!! त्यामुळे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
निमंत्रक –
समस्त पालवे पाटील परिवार,51फाटा, मांडवे, ता. – माळशिरस, जि. सोलापूर
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



