माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत निमगाव मगराचे येथे बळीराजा वावडी महोत्सव 2025 संपन्न होणार…

रिल्स स्टार ऐश्वर्या जाधव बळीराजा वावडी महोत्सवात खास आकर्षण राहणार…
निमगाव (बारामती झटका)
पैलवान प्रतिष्ठान निमगाव मगराचे आयोजित महाराष्ट्रातील पारंपारिक वावडी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. निमगाव मगराचे येथे रविवार दि. 10/08/2025 रोजी सकाळी 10 ते 06 वाजेपर्यंत बळीराजा वावडी महोत्सव 2025 आयोजित केलेला आहे. यंदाचे वावडी महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे..
बळीराजा वावडी महोत्सव 2025 कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर, माढा विधानसभेचे आमदार अभिजीत (आबा) पाटील, देवदूत हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम. के. इनामदार, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे, मल्लसम्राट रावसाहेब (आप्पा) मगर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब (छोटा) मगर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खंडोबा मंदिराच्या पाठीमागे निमगाव मगराचे, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

सदरच्या वावडी महोत्सवाचे खास प्रमुख आकर्षण रील्स स्टार ऐश्वर्या जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
वावडी एक फुटापासून ते आठ फुटांपर्यंत, आठ फुटांपासून ते बारा फुटांपर्यंत आणि बारा फुट व त्यावरील असे तीन गट तयार केलेले आहेत. त्यामध्ये
गट क्रमांक 1) 01 फूट ते 08 फुटापर्यंत प्रथम क्रमांक – सन्मान चिन्हव 5555 रू., द्वितीय क्रमांक – सन्मानचिन्ह व 3333 रू., तृतीय क्रमांक – सन्मान चिन्ह व 2500 रू., उत्तेजनार्थ क्रमांक – सन्मान चिन्ह व 1500 रू.
गट क्रमांक 2) आठ फूट ते 12 फुटापर्यंत प्रथम क्रमांक – सन्मान चिन्ह व आठ हजार 100 रू., द्वितीय क्रमांक – सन्मान चिन्ह व 6000 रू., तृतीय क्रमांक – सन्मान चिन्ह व 4000 रू., उत्तेजनार्थ क्रमांक – सन्मान चिन्ह व 2500 रु.
गट क्रमांक 3) 12 फूट व त्यावरील प्रथम क्रमांक – सन्मान चिन्ह व 10000 रु., द्वितीय क्रमांक – सन्मान चिन्ह व 8000 रू., तृतीय क्रमांक – सन्मानचिन्ह व 6000 रू., उत्तेजनार्थ क्रमांक – सर्वांची 4000 रु. असे बक्षीस राहणार आहे.

तरी वावडी शौकीन यांनी बळीराजा वावडी महोत्सव स्पर्धेसाठी 7038030808/9011296765/9922251819/9552622005 या नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन पैलवान प्रतिष्ठान निमगाव मगराचे यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



